Malegoan | मालेगावात इंधन दरवाढ, महागाईविरोधात काँग्रेसचं भोंगा आंदोलन | Sakal |
मालेगावात इंधन दरवाढ, महागाईविरोधात काँग्रेसचं भोंगा आंदोलन
नाशिक जिल्ह्यातीलम मालेगाव शहरात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारविरोधात भोंगा आंदोलन करण्यात आलं. इंधन दरवाढ आणि महागाईविरोधात स्थानिक काँग्रेस नेत्यांकडून भोंगा आंदोलन करण्यात आलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सत्तेवर येताना महागाई, रोजगाराविषयी दिलेली आश्वासनं आणि भाषणं भोंग्यावर लावून काँग्रेसकडून हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी मोदी सरकार सर्वसामान्यांच्या गरजा भागवण्यात आणि महागाई नियंत्रणात आणण्यात अपयशी ठरल्याचा आरोपही आंदोलकांकडून करण्यात आला.
#Sakal #Malegoan #Congress #Protest #Maharashtra#